Ad will apear here
Next
१८ ते २१ सप्टेंबरदरम्यान रंगणार विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा
पुणे : दर वर्षीप्रमाणे यंदाही विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१७ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे संस्थापक हेमंत नगरकर यांनी ही माहिती दिली. या वेळी ‘विनोदोत्तम करंडक’चे अध्यक्ष मनोहर कोलते, खजिनदार अमर परदेशी उपस्थित होते.

या वेळी हेमंत नगरकर म्हणाले, ‘यंदाचे स्पर्धेचे अकरावे वर्ष असून स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद वाढतोच आहे. भरत नाट्यमंदिरात होणारी ही स्पर्धा सोमवार, १८ सप्टेंबर रोजी सुरू होणार असून, गुरुवार, २१ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. २१ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होईल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांसाठी दिनांक एक ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत संस्थेच्या नारायण पेठेतील कार्यालयात प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ३१ ऑगस्ट रोजी प्राप्त प्रवेशिकांमधून लॉट्स काढण्यात येऊन, त्यानुसार या स्पर्धेसाठी संघांचे प्रवेश निश्चित करणार येणार आहेत. त्यानंतर स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.’

या स्पर्धेच्या माध्यमातून रंगकर्मींना निखळ विनोदनिर्मितीसाठी एक मनमोकळे, दिलखुलास व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर अशा विविध ठिकाणच्या महाविद्यालयांतदेखील या स्पर्धेकरिता विशेष आर्थिक तरतूद केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय या स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेत असते. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना व्यासपीठाचे धारिष्ट्य प्राप्त व्हावे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

स्पर्धेच्या पारितोषिकांबाबत मनोहर कोलते यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘स्पर्धेतील विजेत्या संघाला दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन पुरस्कार, दहा हजार रुपये रोख, करंडक आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपात पारितोषिक देण्यात येते. द्वितीय क्रमांक मिळालेल्या संघाला सात हजार रुपये रोख, करंडक आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपाचा अमर राजपूत परदेशी पुरस्कार दिला जातो. तृतीय क्रमांक मिळवलेल्या संघाला सुहास देशपांडे यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ पाच हजार रुपये रोख, करंडक आणि स्मृतिचिन्ह असे पारितोषिक देण्यात येते. तसेच अभिनय, नेपथ्य, लेखन, प्रकाशयोजना आदी विभागांतर्गत पुरुष आणि महिला अशी प्रत्येकी दोन वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिके दिली जातात. तसेच गेल्या पाच वर्षांपासून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक स्वर्गीय रवींद्र सांभारे यांच्या स्मरणार्थ श्रीमती रश्मी सांभारे पुरस्कृत पारितोषिक देण्यात येते. त्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे तीन, दोन आणि एक हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह अशी पारितोषिके दिली जातात. या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. या स्पर्धेच्या निमित्ताने योग्य वयातच सादरीकरणातील चुका स्वीकारण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची सवय लागते.’

या वेळी खजिनदार अमर परदेशी म्हणाले, ‘विनोद हा विषय सर्वार्थाने सहजतेने घेतला जातो. या एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या वर्षी आमच्या संस्थेतर्फे ‘विनोद’ या विषयावर सतीश आळेकर, डॉ. विवेक बेळे आणि सुरेशचंद्र पाध्ये यांसारख्या सिने-नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञांची कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. विनोदोत्तम करंडक स्पर्धा अर्थात या हास्यवर्धन अभियानाला २००७पासून प्रारंभ झाला. दर वर्षी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विनोदाचे अनेक प्रकार असतात. परंतु अंगविक्षेप करून, हलक्या दर्जाची भाषा वापरून निर्माण होणारे विनोद या स्पर्धेदरम्यान आर्वजून टाळले जातात. निखळ विनोद हेच या स्पर्धेचे सूत्र आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी हे बिरुद मिळविलेल्या शहरात अनेक नाट्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. परंतु केवळ विनोद ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन गेली दहा वर्षे सातत्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे, हे विशेष.’ विद्यार्थी आणि परीक्षक दर वर्षी या स्पर्धेची वाट पाहत असतात, असेही आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

स्पर्धेचा कालावधी : १८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०१७ 
प्रवेशिका मिळण्याचा कालावधी : एक ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०१७
कार्यालयाचा पत्ता : ६८१, नारायण पेठ, पुणे-३०

संपर्क : 
हेमंत नगरकर : संस्थापक : ९८५०९ १४८१० 
मनोहर कोलते : अध्यक्ष : ७८९५९५९८९८
अमर परदेशी : खजिनदार : ९८५०३०४४३० 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZLOBE
Similar Posts
मिडास ट्रॉफी एकांकिका स्पर्धा उत्साहात पुणे : तेजल क्रिएशन्स, रिआन व आयजे कॅटॅलिस्टस यांच्या वतीने पुण्यात मिडास ट्रॉफी ही परकीय भाषांमधील एकांकिका स्पर्धा नुकतीच भरतनाट्य मंदिर येथे पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या संघांनी जर्मन, इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच अशा अनेक भाषांमध्ये विविध एकांकिका सादर केल्या. तब्बल १० एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language